Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

Rohida Mahotsav -2017

रोहिडा महोत्सव - २०१७

थंडीचे दिवस आले की गायन आणि संगीत रसिकांना वेध लागतात ते सवाई, वसोंत्सवासारख्या उत्सवांचे!!! तसेच काहीसे आम्हा सह्याद्री भटक्यांचे असते. आपल्या सह्याद्रीला जवळुन अनुभवण्यासाठी थंडीच्या महिन्यात सर्वात जास्त गिरिभ्रमणांचे आयोजन होत असते. तसा आपला सह्याद्री सगळ्या ऋतूंमध्ये अनुभवयाचा पण याच महिन्यात तो जास्त सुखःकारक ठरतो.

 

प्रतिमेेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ढग, मजकूर, निसर्ग आणि बाहेरील

 

रोहिडा महोत्सवाची सर्वांत पहिल्यांदा योजना आखली ती २०१४ मध्ये! यात किल्याच्या पायथ्याशी तंबूमध्ये रहाणे, गावाकडची दिनचर्या आणि चुलीवरील जेवण यांने त्यावेळी या महोत्सवाला आलेल्या गडप्रेमिंना खुप काही दिले.

दुर्ग, त्याचे संवर्धन, त्यातुनच एक पर्यटन यांची मोट बांधुन संस्थेने हा उपक्रम राबवुन दाखवला. याची नोंद शासनाने सुद्धा घेतली. आणि मागील वर्षी रायगड किल्याच्या महोत्सव केला त्यामध्ये श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या अनुभव आणि योजनेचा अभ्यास करून तो शासनाने करून दाखवला.

यात महत्वाची बाब अशी की, दुर्गांच्या संवर्धनाकडे गडप्रेमी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. किल्ले आपली शौर्यस्थळे आहेत आणि ती फक्त शासन नाहीतर लोकसहभागातुन सांभाळली पाहिजे हा विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यात संस्थेला यश आले.

येत्या वर्षी संस्थेने २८ जानेवारी ते २९ जानेवारी २०१७ यादिवशी हा महोत्सवाचे आयोजन रोहिडा किल्यावर केले आहे. यामध्ये किल्यावर तंबूत रहाणे, गड दर्शनबरोबर त्या किल्याचा इतिहास यांची ओळख, रात्री आकाश निरिक्षण, सोबत चुलीवरील शाकाहरी जेवण याचे नियोजन आहे. हा संपुर्ण उपक्रम सशुल्क आहे. प्रत्येक व्यक्तीस १६००₹ यामध्ये वर सांगितलेल्या सर्व गोष्टी अंतर्भुत आहेत. ग्रुपमध्ये रजिस्टरेशन करणारे लोकांना डिस्काऊंट आहे.

या महोत्सवाचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे रोहिडा 'फोर्ट रन'. आज आपण वेगवेगळ्या कारणासांठी मॅरेथाॅन धावत असतो, पण दुर्ग संवर्धनाचा हेतू घेऊन आम्ही या मॅरेथाॅनचे आयोजन याच दिवसांत केले आहे.

आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या बरोबर या महोत्सवला यावे. गडांचा इतिहास आणि त्याच्या बरोबर रहाण्याचा एक अनोखा अनुभव आपणास मिळेल यात कोणतीही शंका वाटत नाही. सर्व खर्च वगळता उरलेला सर्व निधी दुर्ग संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.

आधिक माहिती करिता आपण खालिल व्यक्तींशी संपर्क साधावा.

मोबाईल क्रमांक

+919822310713
+919822670558
+919422305279 
+919545521323

 

प्रतिमेेत याचा समावेश असू श्‍ाकतो: मजकूर

दर्शन वाघ.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे.
॥ऐतिहासिक वास्तुंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील॥
WWW.facbook.com/Shivdurg
WWW.Shivdurg.org

 
Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

March 2019
SunMonTueWedThuFriSat
     
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
      
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html