Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

Challenges

श्री शिवदुर्ग संवर्धन =  ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हाने:
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनातील आव्हानांबद्दल थोडक्यात सांगावयचे झाले तर; “दुर्गमता, लोकसहभाग, अनास्था, वेळ, आर्थिक बाबी, सातत्य, संघटन, जनजागृती, माहिती व प्रसारण, मर्यादा, कश्याप्रकारे आणि कश्याचे संवर्धन” अशा शब्दांमध्ये मांडता येते. त्यात दुर्गसंवर्धनाची व्याप्ती बघता हे काम एकट्या दुकट्य़ाचे नाही तसेच एखाद्या शासकीय किंवा विनाअनुदानीत संस्थेचेही नाही. एखादा किल्ला निवडला असता त्याकिल्ल्याचे भौगोलिक स्थान, उंची, त्या प्रदेशाबद्दलची माहीती व इतिहास, त्याकिल्यावरील वास्तुंचा अभ्यास, वृक्ष आणि जंगल संपदा, वन्यजीव, किटक अशा महत्वाच्या बाबींचा विचार आधी करावा लागतो. तसेच पर्यटनातुन असणारा लोकांचा रातबा अशा गोष्टीं विचारात घ्याव्या लागतात. किल्ल्य़ावर संवर्धनामध्ये किल्ला हा एक केंद्रबिंदू म्हणुन पकडला असता त्याच्या भोवताली असलेल्या प्रदेशांचा अभ्यास असलेले व्यक्तींना एकत्र आणुन सर्व समावेशक आणि सर्वमान्य आरखडा बनवावा लागतो. किल्ल्य़ावरील एखादे पाण्याचे टाके स्वच्छ करावयाचे असल्यास त्या पाण्याची पत, त्यातील गाळ, त्यामध्ये असलेल्या ऐतिहासिक पुरावे देणारे वस्तू, त्या टाक्याची घनता / व्याप्ती असे सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे आर्किओलोजी, जल तज्ञ, स्थापत्य तज्ञ अशा लोकांचे मत घ्यावे लागते. अशा गोष्टी पुर्णत्वाला जाण्य़ाकरता लोकसहभाग आणि सातत्य जरुरीचे असते. किल्ला म्हणला तर तो दुर्गम प्रदेशामध्ये असणार; एका दुर्गम प्रदेशामध्ये असल्याने तेथे जाऊन काम करणाय़ाची इच्छा असली तरी उमेद बरय़ाचदा लोकांच्यात रहात नाही. आम्ही संवर्धन उपक्रम राबवीत असलेले हे किल्ले मुख्यत्वे गिरीदुर्ग श्रेणीतले असल्याने तेथे पोहचणे आणि काम करणे म्हणजे मोठे आव्हान असते. बरयाचदा असे दिसुन आले आहे की अशा एखाद्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेला व्यक्ती अशा कामांपासुन दुर जातो किंवा त्याच्यात सातत्य रहात नाही. ह्यामध्ये कोणाला दोष देऊन उपयोग नाही कारण हे कामच मुळी कष्टाचे आहे.
किल्ल्याला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी भेट देणारे आहेत; काही एकटे येतात तर काही संखेत येतात. त्यात वेगवेगळ्य़ा विचारांचे लोक येत असल्य़ाने त्यांच्याकडुन अनावधानाने किंवा जाणिव पुर्वक वास्तूंची छेडछाड होत असते. अशा पर्यटनांतून बरय़ाचदा प्लास्टीक कचरा, वास्तूंची पडझड किंवा एखादा अपघात अशी आव्हाने उभी ठाकतात. त्यासाठी आपण जात असलेल्या प्रदेशाचा अभ्यास त्याची दुर्गमता लक्षात घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचे पर्यटन करणारया बरय़ाच संस्था पुणे – मुंबई शहरात आहेत. पण त्यातुन सातत्याने दुर्ग संवर्धन मोहिमांमध्ये सहभागी होणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्य़ा इतकेच आहेत. त्यांच्यातले कित्येक लोक आपण किती किल्ले सर केले, अमुकअमुक दिवसात ४-६ किल्ले अशा प्रकारचे चढाओढ लावणारे दिसतात. पण एखाद्या किल्लावर संवर्धना करीता अनेकवार जाणारया तुमच्या-आमच्यातील लोकांशी ते काय स्पर्धा करणार!! एकुण आपल्या ऐतिहासिक वास्तूंबद्दल असलेली अनास्थाच ह्यातुन दिसुन येते. अशा नेहमी किल्ल्यांना भेटी देणारय़ा लोकांमधुनच किल्यावर चालेलेल्या कामात सहभाग होण्य़ाचे आव्हान सर्व संस्थांसमोर आहे. किल्ल्य़ावर कामाला येणारा मनुष्य हा सर्वसामान्य नाहीतर अशा दुर्गम प्रदेशांना नेहमी भेटी देणाराच आहे आणि हाच व्यक्ती हे काम करू शकतो असे माझे मत आहे. हे सदरहू काम शहरापासुन लांब असल्याने जाण्यायेण्य़ामध्ये आणि तेथे काम करताना येत असलेल्या श्रमसीमांमुळे संवर्धन काम दिर्घकाळ चालते. प्रत्येकजण आपापल्या कामांतुन वेळ काढुन येत असल्याने एखादी मोहीम ही दिर्घवेळ चालते. त्यात बरय़ाचदा सातत्य न राहिल्याने काम अर्धवट रहाते हे सत्य आहे. सिंहगडाचा आज जो विकास झाला त्याची मुख्य कारणे म्हणजे शहरापासुन जवळ, किल्ल्य़ावर पोहचता येण्य़ाचे सुकर हमरस्ता आणि तेथे असणारे पर्यटन! पण आपण करीत असलेल्या किल्ल्यांना हे लाभलेले नाही.
अशा कामांमध्ये सर्वात मोठे कोणते आव्हान असेल तर आर्थिक मदतीचे!! संवर्धनाचे काम शहरापासुन लांब आणि कित्येक पट उंचीवर असल्याने ह्या कामात येणारा खर्च चौपट असतो. किल्ल्यावर १० हजार रू. संवर्धन साहित्य पोहचवयास संस्थेला ६० ह्जार रुपये लागले आहेत ही वस्तूस्थिती आहेत. तिकोनावर देऊळाचे छत दुरुस्तीसाठी त्याकिल्ल्यावर नेहमी येणारय़ा एका संस्थेने बांधकाम साहित्यासाठी आर्थिक मदत केली; पण मोठे आव्हान होते ते सामान वरती चढवण्य़ाचे. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ह्या सहित्याचा वाहतुक खर्च वाचावा आणि उपलब्ध निधी जास्तितजास्त किल्ल्यावर वापरता यावा ह्याकरीता स्वत: ते साहित्य डोक्य़ावरुन वाहुन न्हेऊन काम पुर्णत्वास नेले! हे सत्य आहे. आजमितीस संस्थेने कित्येक लोकांना, छोटे-मोठे उद्योगधंदे असणारे व्यक्तींना उद्देश पटवुन दिल्याने आणि त्याच प्रकारचे काम करून दाखवल्याने संस्थेल मासिक वर्गणीदार आणि देणगीदार जोडता आले आहेत. संस्था आज इ.सि.एस. (ECS) पद्धतीने मासिक वर्गणी आपल्या सभासदांकडुन जमा करते. पण कामाचा आवाका जसजसा वाढतो तसे हे उपलद्ध निधी कमी पडत आहे असे बरय़ाचदा जाणवते.
ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जनजागृती आणि माहिती प्रसारण. जनसामान्यांना ह्या चळवळीमध्ये सामिल करून घेण्यासाठी आपला हेतू त्यांच्यापर्यंत पोहचवण्य़ा करीता वृत्तपत्र, इंटरेनेट अशी माध्यमे महत्वाचा वाटा आहे. आजमितीला प्रत्येक तरूणाच्या हाती मोबाईल आणि त्यावरुन संपर्क साधता येतील अशी सोशल साईट माध्यमे आहेत. आपल्या संस्थेचा हेतू संकेस्थळाच्या (Website) माध्यमातून अनेक संस्था वापर करत आहेत. पण त्यातुन अशा उपक्रमांमध्ये सामिल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. एखाद्या वेळेस केलेल्या आवाहनाला लोकांचा प्रतिसाद मिळतो पण त्यांच्या पुढील कामांसाठी हेच सातत्य राहिल ह्याची शाश्वती नसते. ह्यासाठी सर्व संस्थानी एकत्रितरित्या सुयोग्य मार्ग शोधला पाहिजे. वृत्तपत्रे ह्यात मोलाचा सहकारी पण प्रत्येक वेळेला ह्यांचा प्रतिसाद मिळेल असे मानता येत नाही. बरेच वृत्तपत्रे ज्याभागात काम चालू आहे त्या भागातील पुरवणी मध्ये ह्या कामाची बातमी दिली जाते. त्यामुळे सर्वदुर बातमी जात नसल्याने बरेच इच्छुक लोक अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासुन वंचित रहातात. वृत्तपत्र जसे समजाचा आरसा आहे तसेच संवर्धनाच्या कामात कार्यरत असणारय़ा संस्थांचा सुद्धा आरसा बनावा अशी इच्छा आहे.
Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

March 2019
SunMonTueWedThuFriSat
     
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
      
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html