Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/shivdurg/public_html/admin/inc/ex_globle.php on line 60
Shivdurga

Fort Rohida

रोहीडा - विचित्रगड, भोर तालुका, पुणे जिल्हा

दुर्ग रोहीडा:

हा किल्ला हिरडस मावळात येतो म्हणजे पुणे जिल्ह्यामधिल भोर तालुक्यात आहे. ह्या किल्ल्याला बिनीचा किंवा विचित्रगड म्हणुन सुद्धा ओळखले जाते. किल्ला समुद्र सपाटीपासुन ... मी. उंचीवर आहे. चढायला सोप्पा पण दमायला होईल अशी खडी चढण शेवटच्या टप्यात आहे. किल्ल्याचा माथ्याचे एकुन क्षेत्रफळ हे ...... स्के.फी. आहे.

            शिवपुर्वकाळापासुन किल्ला अस्तित्वात होता, हा किल्ला आदिलशाहीचे मांडलिक “बांदल देशमुख” ह्य़ाच्या अखत्यारीत होता. तसेच किल्ल्याची काही देखभाल व वास्तू उभारणी आदिलशाही काळात झाली असावी ह्याचे काही पुरावे किल्ल्यावर अजुनही आढळतात. तिसरय़ा दरवाज्यावरील शिलालेख हा त्याचा उत्तम नमुना ठरेल. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमधिल पहिल्या काही कारवाई केल्या त्यामध्ये बांदल देशमुखांचा युद्धात पराजय करून हा किल्ला हस्तगत केला. ह्या किल्ल्याच्या इतिहासातील काही प्रमुख नोंदी म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडाच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या सारखे सेवक महाराजाच्या पदरी नोकरीत आले. पुढे रोहीडा किल्ला भोरचे पंतसचिव ह्यांच्याकडे होता आणि त्याची निगा ही अगदी भारताच्या स्वातंत्र्यकाळापर्यंत राखली जात होती. संस्थाने खालसा झाली आणि ह्याकिल्ल्याची खरी दुरावस्था चालू झाली.

            २०११ वर्षाच्य़ा सुरवातीला हया किल्लाच्या संवर्धनाकरीता बाजारवाडीच्या ग्रामस्थांशी चर्चाकरून ठरलेल्या कामांस संस्थेने किल्यावरील संवर्धन कार्यास सुरवात केली. त्याआधी म्हणजे २००७ मध्ये रोहीडा किल्यावरील रोहीडमल्लमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यात सदस्य सहभागी झाले होते. २००८ मध्ये जुन्या धाटणीचा दरवाजा संस्थेच्या वतीने बसवण्यात आला होता. पुढील काही महिन्यांअध्ये पहिला दरवाज्याजवळील खचलेला मार्ग दुरुस्त करण्य़ात आला. पहिला आणि दुसरा दरवाज्यामधील दगड धोंडे, झुडपे स्वच्छ करून वाट मोकळी करण्य़ात आली. दरड कोसळून मोठ्या शीळा ज्यावाटेत पडल्या होत्या त्या बाजुला करण्य़ात आल्या. किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे जे भुमिगत टाके आहे ते गाळ उपसुन स्वच्छ करण्यात आले.

            ह्याकिल्याला तीन लागोपाठ दरवज्यांची माळ आहे, सदर, रोहीडमल्ल मंदिर आणि त्याजवळील वाड्यांचे जोते, सात बुरुज आणि वेगवेगळ्या आकारांची पाण्याची टाकी अश्या अनेकविध गोष्टी किल्यावर पहावयास मिळतात. संस्थेने जेव्हा किल्यावर संवर्धनाचे काम चालू केले तेव्हा सगळीकडे रान माजलेले होते. पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ, प्लास्टीक कचरा अस्या समस्या डोळ्यासमोर होत्या. पहिला दरवाज्याजवळील बुरुजाचा काही भाग पावसळ्याच्य़ा दिवसांमध्ये ढासळला होता. तसेच चोर दरवाज्या जवळील भिंतीचे दगड ढासळलेले होते. ह्यासर्व पुढे करावयाच्या कामांचा अग्रक्रम ठरवुन पहिल्या दरवाज्याजवळील बुरुजाच्या कामांस सुरवात केली. बुरुजांवर वाढलेले गवत झुडपे काढुन स्वच्छ करण्य़ात आला. बुरुजांच्या तसेच किल्ल्यांवरील इतर वास्तूंना वाहुन येणारय़ा पावसाच्या पाण्याचा धोका असतो. ह्याचा बांधकामाच्यावेळी सुद्धा विचार झालेला असतो, त्या करीत पाणी वाहून जाण्याकरीता मार्ग करुन ठेवलेले असतात. ह्या मार्गांमध्ये बाहुन आलेला गाळ आणि दगडधोंडे अडकल्याने ते पाण्य़ाचा निचरा होत नव्हता. कालांतराने चिरा आणि भेगांमधुन पाणी वाहून त्या बुरुजाची भिंत ढासळली. हे जाणुन संस्थेने हे पाण्य़ाचे मार्ग स्वच्छ केले. त्यात अडकलेली दगडमाती काढुन टाकण्यात आली. बुरुजाच्या आतील बाजुस पडलेले दगड एकत्र करुन ताल बांधुन घेण्यात आली. बुरुजाच्या पृष्ठभागावरील जमिनीला उतार करुन पाण्याचा निचरा होत राहील ह्याची खबरदारी घेण्यात आली. सध्या ह्याबुरुजाची होणारी दुरावस्था मोठ्याप्रमाणात थांबवण्यास संस्थेला यश प्राप्त झाले.

२०११ मध्ये संस्थेने रोहीडा किल्ला दुर्ग संवर्धन चळवळी साठी एक उत्तम नमुना ठरावा तशी प्रेरणा घेऊन एखाद्या संस्थेने आपण करीत किल्ल्यावर राबवावा ह्या उद्देशाने काम करण्य़ाचे ठरवले. किल्ल्यावरील बुरुज वाड्य़ांची जोती, पाण्य़ाची इतर टाकी तसेच दरवाज्याजवळील कक्ष ह्याच्या दृष्टीने संवर्धन उपक्रम राबवण्य़ाचा आराखडा बनवण्य़ात आला. ह्याचे मुळ स्वरुप जर लोकांसमोर आणण्य़ाचे संस्थेने नियोजन केले. डिसेंबर च्या महिन्यात सदरचे ढासळलेल्या भिंती खाली उतरवण्य़ात आल्या. त्यातील दगडांची वर्गवारीकरुन एकत्र जमा करण्य़ात आले.

’सदर’ ही वास्तू किल्ल्याचे हृदय! ह्याच सदरेवर त्या प्रदेशातील समस्या, तंटयांचा तोडगा काढला जात असे, न्यायदाना सारख्या गोष्टी इथुनच केल्या जायच्या. पणं सध्या काळात त्याचे वैभव टिकले नाही आणि दुर्दशा सुरू झाली. किल्ल्यावर रोहीडमल्ल मंदिर सोडता दुसरी वास्तू नाही. येणारय़ा पर्यटकांना देऊळात जागा नसल्यास दुसरा आसरा देणारी वास्तू नसल्याने ह्या सदरेचे पुर्नउभारणी गरज संस्थेला जाणवली. ह्यासदरेचे काम अगदी जुन्या धाटणीचे असावे हा उद्देश डोळ्य़ासमोर ठेऊन संस्थेना कामास सुरवात करण्य़ात आली आहे. किल्ल्यावरील सदरे सारख्या वास्तूची उभारणी शहरी भागात करावयाची झाल्यास त्याचा खर्च हा फक्त ७० हजार रुपये आहे. पणं सदरेचे काम हे कित्येक फुट उंचीवर असल्याने ह्यात येणारा खर्च पाच-सहा पटीने वाढतो. बांधकाम साहित्य चढवणे ह्यात येणारा खर्च जास्त असतो. संस्था सध्या विविध स्तरातील लोकांची भेट घेऊन ह्या कामाकरीता निधी गोळा करीत आहे. 

डिसेंबर २०११ च्या काळात दरवज्याजवळील सैनिकांच्या कक्षांची स्वच्छता करण्यात आली. ह्यावर वाढलेली झुडपे काढुन टाकुन त्रण नाशकाची फवारणी करण्य़ात आली. पडलेले दगद एका बाजुला रचुन ठेवण्य़ात आले. त्यामुळे दरवाज्याची बांधणी तसेच त्यातल्या देवड्या अश्या गोष्टी दिसू लागल्या. ह्यातुन किल्ल्याचे दुर्ग स्थापत्यातील विचार आपल्याला दिसुन येतो.  आधी नमुद केल्याप्रमाणे गडावरील चोर दरवाजा जवळील भीतीचे दगड ढासळलेले होते तर काही दगड पुन्हा त्याजागी रचण्यात आले. जुलै २०१२ मध्ये पुढील वर्षामध्ये करण्य़ात येणारय़ा कामांची सविस्तर चर्चा पुरातत्व विभाग आणि वन खात्याच्या जिल्हा ऑफिसमध्ये जाऊन करण्य़ात आली. लेखी निवेदन आणि पत्रे देऊन काम करण्य़ाची परवानगी घेण्य़ात आली. ह्याकामांमध्ये रोहीडा किल्ल्यावर जाणारा मार्ग सुनिश्चित करणे, किल्ल्यावरील टाके स्वच्छता, बुरुजा जवळ मातीचा गाळ काढून त्याचे मुळ स्वरुपात आणणे अश्या कामांची परवानगी घेण्यात आली.

२०१३ च्य़ा सुरवाती पासुन किल्यांवरील सर्व बुरुजांची स्वच्छता करण्य़ास सुरवात झाली. शितोळे बुरुज, वाघजाई, सर्जा अश्या बुरुजांची स्वच्छता करण्यात आली. उन्हाळ्य़ाच्या सुरवातीस रोहीडमल्ल मंदिरा समोर असलेल्या पण गाळाने भेरलेल्या तळ्याच्या स्वच्छतेला सुरवात झाली. दगड धोंडे आधिच काढण्यात आले होते. १ मे २०१३ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन मोठी मोहीम आखण्यात आली. मोहीमेमध्ये सास्थिकांचा सहभागातुन आणि श्रमदानातुन हे तळे पुर्ण सवच्छ करण्यात आले. हे तळे समांतर खोदिव तळे नाही. काही भाग उथळ तर दुसरय़ा बाजुला हे तळे ७ फुटापर्यंत खोल असल्याचे आढळले. सर्व गाळ उपसुन झाल्यावर त्यात असलेल्या दगडांची ताल बांधुन घेण्यात आली. पुर्वी हे तळे पावसाळ्य़ानतंर ऑक्टोबरच्या कडक उन्हामध्ये लगेच आटुन जाई पण आता ह्या तळ्य़ाची पाणी साठवण्य़ाची क्षमता वाढली असुन त्याचे पाणी अगदी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत टिकुन राहत आहे. हे पाणी नक्किच पिण्यायोग्य नाही पण हात पाय धुण्याकरीता वापर गडावर आलेल्या लोकांकडुन केला जातो.
            किल्ल्यावर भटकंती करीत असताना किल्ल्यावर असलेल्या सर्व वास्तूंना भेट देता यावी अशी संकल्पना जागृत झाली. त्या वास्तुपर्यंत पोहचण्य़ाच्या दॄष्टीने अंतर्गत कच्चा रस्त्यांची आखणी करण्य़ात आली. किल्ल्याला भेट देणारे ऐकिव अथवा एखाद्या पुस्तकाच्या माहितीवरुन किल्ल्यांना भेती देत असतात, पण ह्यामध्ये सगळ्य़ाच वास्तूंची माहिती असेलच असे नाही. म्हणुन अंतर्गत रस्ते बनवण्य़ाने किल्ल्याला भेट देणारे एका वास्तूकडुन दुसरया वास्तूकडे जाण्य़ासाठी जर रस्ते बनवले तर येणारय़ा सर्व लोकांना किल्ला पहावयास मदतच होईल. असा हेतू बाळगुन संस्थेने रस्त्यांची सकल्पनआ राबवण्य़ास सुरवात केली. १० फुट रुंद अश्या कच्चा पण आखिव रस्ता बनवण्यास सुरवात झाली. रस्त्यामध्ये असलेले खड्डे तेथेच असलेल्या माती आणि दगड वापरुन भरून घेण्य़ात आले. रस्त्य़ाच्या दुतर्फा दगड मांडून पाढरा रंग देण्य़ात आला. आजमितीला किल्ल्यावरील सर्व बुरज, रोहीडमल्ल मंदिर किल्ल्यावरील विविध पाण्य़ाची टाकी चुन्याचा घाणा अश्या वास्तू ह्या अंतर्गत रस्त्यांनी जोडण्य़ात आले आहेत.

रोहीडाची खासिय म्हणजे किल्लावरील बुरुज अजुनही सुस्थितीत आहेत. किल्ला तसा छोटा असल्याने एका दिवसात पहाता येण्याजोगा आहे. किल्यावरील वास्तू, चुन्याचा घाणा तसेच किल्ल्यावरून बाजुच्या प्रदेशावर नजर फिरवता एकुण ७ किल्याचे दर्शन घडते. आजच्या काळात पालकांना किल्ला म्हटलं तर काय दाखवायचं असा प्रश्ण पडतो त्यांनी जरुर आपल्या मुलांना घेऊन ह्या किल्याला भेट देऊ शकतात. चढाईस सोपा आणि पुण्य़ापासुन जवळ असणारा किल्ला एका दिवसाच्या छोट्या सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे.

रायरेश्वर मंदिर आणि रायरेश्वर पठार = २०१० -११ मध्ये रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ आणि रायरेश्वर मंदिराच्या दृष्टीने संस्थेने काही उपक्रम राबवीला. रायरेश्वरांवर अभिषेक करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ह्यामंदिराचा जिर्णोद्धारासाठी करण्य़ात आलेल्या कामामधुने मंदिराच्या सौंदर्याला धक्का लागला होता. त्याचे मुळ स्वरुप लोकांना बघायला मिळावे म्हणुन संस्थेने मंदिरातील टाईल्सच बांधकाम काढण्य़ात आले. मंदिरांच्या खांबावर ऑईलपेंट देण्य़ात आला होता, तो काढुन टाकण्य़ात आला आणि दगडी वार्निश लावण्य़ात आले. देऊळाच्य़ा सभा मंडपात कोटाफरशी करण्य़ात आले. देऊळाच्या सोईकरीता म्हणुन छत्रपती शिवाजी महारांनी जंगमाना तेथे वसविले, त्याचे वंशज अजुनही येथे देवळाची निगा राखत आहेत. ह्याच्या वस्तीसाठी रायरेश्वर पठारावर एक पाण्याचे कुंड आहे. त्याचा वापर कपडे, भांडी धुण्यासाठी करत आहेते तसेच पिण्य़ाचे पाणी सुद्धा येथुनच भरले जायचे. एका गोमुखाला कळशी आडकवुन पाणी भरले जात असे. सर्व कामांसाठी एकच कुंड असल्याने पाणी प्रदूषीत होई.  ह्याकरीता कुंडामध्ये अजुन एक छोटे कुंड बाधण्यात आले. पिण्याचे पाणी छोट्या कुंडात साठून अतिरिक्त पाणी बाजुच्या कुंडात साठेल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे पिण्यायोग्य आणि वापरायचे पाणी वेगवेगळे राहील अशी सोय संस्थेतर्फे करण्य़ात आली.

 

Rohida
 
Testimonials

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने करण्यात येणारे काम अतिशय स्तुत्य असून ह्यापुढील कामाला शुभेच्छा!!

By अरविंद तेलकर. पुणे.

Event Calendar

March 2019
SunMonTueWedThuFriSat
     
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
      
Date Activity Details

News

दुर्ग रोहीडा

संस्थेतर्फे रोहीडा किल्यावर असलेल्या सदरच्या पुर्नउभारणीचे काम सध्या चालू आहे.

Fort Run Rohida and For Rohida Utstav 2017

1) Rohida Utsav 2017 to be held on the Fort Rohida for two days 28th & 29 th January 2017 2) FORT Run Rohida 2017 Event on 29th January 2017

*THE FORT RUN – Rohida (Evening Half Marathon)*

Overview: Our Aim is to spread awareness about Fort Conservation & Restoration amongst the society & raise funds for the same. The scenic landscape of Fort Rohida adds the value to experience for the Runners, along with the Fort Climb to reach the Finish line. https://adventures365.in/rohida-fort-run-half-marathon.html